नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना, यासंदर्भातील नव्या व्यवस्थेची घोषणा केली. 'आधार' असेल तर, त्याआधारे तात्काळ पॅन क्रमांक ऑनलाइन पद्धतीनं मिळेल. त्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, असं सीतारामन यांनी सांगितलं.
करदात्यांची 'आधार'द्वारे पडताळणीही सुरू करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. करदात्यांना सोयीस्कर व्हावं यासाठी लवकरच नवी यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 'आधार'द्वारे तात्काळ ऑनलाइन पॅन क्रमांक दिला जाईल. त्यासाठी अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. आयकर कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करतेवेळी आपल्या आधार क्रमांकाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन आणि आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक रिटर्न फाइल करण्याव्यतिरिक्त बँक खाते उघडणे आणि आर्थिक देवाण-घेवाण यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.