२४ जानेवारीला वंचितचा महाराष्ट्र बंद ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2020

२४ जानेवारीला वंचितचा महाराष्ट्र बंद !


मुंबई: एनआरसी, सीएए आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली.

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Post Bottom Ad