'एसआरए'मधील सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 January 2020

'एसआरए'मधील सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची मागणी


मुंबई, दि. 15 : झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फुटापर्यंत वाढविण्याची मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शेख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून यासंबंधीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, झोपडपट्टीतील नागरिकांना सध्या पुनर्विकासात देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ अपुरे पडते. पाच व्यक्तीचे कुटुंब असेल तर जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे 'एसआरए' योजनेनुसार पात्र झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ. फुट केल्यास त्यांच्या राहणीमान सुधारण्यास मदत होईल. झोपडपट्टी धारकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना हक्काचे मोठे घर मिळावे, यासाठी तातडीने मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फूट करण्याचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी शेख यांनी या निवेदनात केली आहे.

Post Bottom Ad