थंडीने मुंबईकर कुडकुडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2020

थंडीने मुंबईकर कुडकुडले


मुंबई -- थंडीची प्रतीक्षा असलेल्या मुंबईकरांना आता हिवाळ्याचा गारठा जाणवायला लागला आहे. उशीरा का होईना मुंबईत थंडीला सुरुवात झाली आहे. गुरूवारची पहाट मुंबईकरांची बोचऱ्या थंडीने झाली. किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. बोरीवलीत १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर वातावरणात गारठा होता. पुढचे दोन दिवस मुंबईत थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बुधवार संध्याकाळपासूनच मुंबईतल्या अनेक भागात गारठ्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे घरी परतणा-या चाकरमानी गारठले. गुरुवारी सकाळी बोच-या थंडीने सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांनी थंडीसाठी आणून ठेवलली स्वेटर, मफलर, कानटोपी बाहेर काढली. दिवसभर वातावरणात गारवा होता. बोच-या थंडीने मुंबईकरांना हिवाळा असल्याचे जाणवायला लागले. बुधवारी पवई येथेही १४ अंशांपर्यंत पारा खाली उतरला होता. गोरेगाव येथे तापमान १५ अंशांच्या आसपास होते. पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरवासियांनी गारठा अधिक अनुभवला. गुरुवारीही बोरीवली, पवई येथे १२ ते १३ डिग्री, सीएसटीतील फोर्ट, विद्याविहार, घाटकोपर, मुलुंडसह अनेक भागात १६ डीग्री दरम्यान तापमान नोंदवले गेले.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळेच याचा परिणाम मुंबईच्या तापमानावर होऊन मुंबईचे तापमान घसरले आहे. घसरत्या तापमानाबरोबरच मुंबईची हवाही बिघडली आहे. धुरके आणि धुक्यामुळे पहाटेच्या वेळेस दृश्यमानता कमी होत आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईचा पारा १ ते २ डिग्रीने कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Post Bottom Ad