सीएएच्या समर्थनासाठी मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2020

सीएएच्या समर्थनासाठी मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा


मुंबई - मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही, असं सांगतानाच राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. 

गोरेगाव येथे नेस्को मैदानावर मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनला संबोधित करताना राज ठाकरे यांची तोफ धडाडली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो... अशी साद घालतच राज यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली. मी मराठी आहे आणि हिंदूही आहे. धर्मांतर केलेलं नाही. माझी भाषणं तपासा त्यातही तेच ऐकायला मिळेल. हे काही मी आज बोलत नाही. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि माझ्या धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, असा इशारा देतानाच माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. माझे विचार सरळ आणि स्वच्छ आहेत, असं राज म्हणाले.

Post Bottom Ad