पालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक रमेश पवार यांची बदली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2020

पालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक रमेश पवार यांची बदली


मुंबई - मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरु असतानाच शुक्रवारी आयुक्तांचे स्वीय सहाय्यक रमेश पवार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पद् भार स्वीकारला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मागील साडेचार वर्षापासून पालिका आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक म्हणून रमेश पवार काम पाहात होते. त्यांच्या जागेवर मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे तर पवार यांची मालमत्ता कर विभागात बदली झाली आहे. पवार यांनी यापूर्वी विभाग कार्यालयात काम केले आहे. पालिकेचा आर्थिक स्त्रोत असलेला जकात कर बंद झाल्यानंतर उत्पन्न मिळवून देणारा मालमत्ता कर पालिकेचा आर्थिकस्त्रोत बनला आहे. सद्या पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली असल्याने मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. पालिकेच्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या २६० भूखंडांची मुदत पाच वर्षापूर्वी संपली आहे. नवीन धोरणानुसार या मालमत्तांचा ताबा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या विभागातील कामांचे आव्हान पवार यांच्या समोर असणार आहे.

Post Bottom Ad