बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच राज्यभरातील शिवसैनिकांनी शिवाजीपार्कवर गर्दी केली होती. बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले होते. मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण होते. शिवसैनिकांकडून बीकेसीत जल्लोष सोहळा करण्यात आला. ठाकरे कुटुंबीयांनी स्मृतीस्थळासमोर अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाआघाडीतील मंत्री, नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. शिवाजीपार्कवर सकाळपासूनच उपस्थित राहिलेल्या हजारो शिवसैनिकांनी स्मृतीस्थळासमोर नतमस्तक होत अभिवादन केले. गुरुवारी या निमित्ताने मनसेचे गोरेगाव येथे अधिवेशन पार पडले. १४ वर्षानंतर मनसेने झेंडा बदलत त्याचे अनावरण केले. याबाबत शिवाजीपार्कवरील उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या रोखठोक प्रतिक्रिया दिल्या. झेंडा बदलल्याने काही होत नाही. आमच्यासाठी हिंदूदृदय सम्राट एकच बाळासाहेब ठाकरे असतील आणि ते कायम राहतील. मनसेकडून शिवसैनिकांना आमच्या पक्षात सहभागी व्हा, असेच सांगण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मनसेही शिवसेनेतून फुटूनच तयार झालेली आहे, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या.
शिवसेनेत होतो तेव्हापासून हा दिवस लक्षात आहे - भुजबळ
२३ जानेवारी हा आमच्या आठवणींचा दिवस आहे. जेव्हापासून शिवसेनेत होतो तेव्हापासून हा दिवस लक्षात आहे. २३ जानेवारीला शिवसैनिक बाळासाहेबांची आठवण काढतात. आज मी बाळासाहेबाना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. अमित ठाकरे जर राजकारणात येत असेल तर स्वागत आहे. जर राजकारण्यांच्या मुलगा राजकारणी होत असेल तर त्यात वावगे काय आहे. भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्द आहोत असेही भुजबळ यांनी सांगितले.
शिवसेनेचे हिंदुत्व देशाशी निगडीत - संजय राऊत
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले शिवसेनेचे हिंदुत्व कडवट आणि हिंदुस्थानशी निगडीत आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही! ते कायम राहणार, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत सांगितले. प्रत्येक राजकीय पक्ष अनेक वेळा आपली वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपली भूमिका मांडत असतात. त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल मत वक्त केले.
सलग पाच वर्षे येणारा शिवसैनिक -
राज्यभरातून स्मृतिस्थळावर येणार्या शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. यांमध्ये ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे प्रमाणही मोठे होते. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी रामचंद्र गायकवाड हे परभणीहून सायकलवरून आले होते. १७ जानेवारीला ते परभणीहून निघून गुरुवारी सकाळी स्मृतिस्थळावर पोहोचले. त्यांनी आपल्या सायकलला भगवा रंग दिला होता. शिवाय सायकलवर शिवसेनाप्रमुखांची प्रतिमाही लावली होती.