मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' ला विलासराव देशमुख यांचे नाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2020

मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' ला विलासराव देशमुख यांचे नाव


मुंबई, दि. 14 :- मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला केली.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच 'इस्टर्न फ्री वे'च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन 'इस्टर्न फ्री वे'ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.

Post Bottom Ad