मुंबई - नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत बेस्टने आणि मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टकडून आज मंगळवारी रात्री २० जादा बस सेवा पुरवण्यात येणार आहे. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेने उपनगरांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी जादा लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नववर्षाचे स्वागत करून घरी परतणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
बेस्ट बसेसच्या क्र. ७ मर्या., १११, ११२, २०३, २३१, २४७ या मार्गांवर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहे. त्यानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते राणी लक्ष्मीचौक मार्गावरील ७ मर्या., ही बस मध्यरात्री १२.१५ आणि १२.३० वा. सुटेल. बस क्र. १११ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रा. ११.३०वा., रा. १२ वा. आणि रा. १२.१५ वा. सुटेल. बस क्र. ११२ ही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ते च्रचगेट स्थानकासाठी रा. १०वा., रा. १०.१५ वा., रा. १०.३० वा., रा. १०.४५ वा., रा. ११ वा. सोडण्यात येणार आहे. अंधेरी पश्चिमेतून जुहू किनाऱ्यासाठी रा. ११वा., रा. ११.१५ वा., रा. ११.३०वा. सुटेल. सांताक्रूझ (प.) स्थानकातून जुहू बस आगारासाठी रा. १० वा., रा. १०.२० वा., रा. १०.४५ वा., रा. ११ वा., रा. ११.१५ वा. सुटतील. बोरिवली स्थानक पश्चिमेपासून गोराई किनाऱ्यासाठी रा. १०.१५ वा., रा. १०.३० वा. बस उपलब्ध असणार आहे.
मेन लाईन आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी २-२ गाड्या धावणार आहेत. या लोकल १२ डब्यांच्या असणार आहेत. डाऊन मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वा तर पश्चिम मार्गावर कल्याण ते सीएसएमटी रात्री.१.३०वाजता लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी ट्रेन रात्री १.३०वाजता आणि सीएसएमटी ते पनवेल ट्रेन रात्री १.३० वाजता सुटणार आहे. या लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. या विशेष लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेनेही चर्चगेट ते विरार दरम्यान आणि विरार ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी चार अशा एकूण आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विशेष लोकल परेच्या सर्व स्थानकांवर थांबतील. यामध्ये चर्चगेटवरून अनुक्रमे मध्यरात्री 1.15, 2, 2.30 आणि 3.25 वाजता एकूण चार विशेष लोकल विरारसाठी रवाना होतील. या विशेष लोकल विरारला अनुक्रमे मध्यरात्री 2.55, 3.40, 4.10 आणि 5.05 वाजता पोहचतील. याउलट विरारहून चार विशेष लोकल अनुक्रमे मध्यरात्री 12.15, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता सुटतील. या विशेष लोकल चर्चगेटला अनुक्रमे मध्यरात्री 1.52, 2.22, 3.17 आणि 4.41 वाजता पोहचतील. तरी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी विशेष लोकलची वेळ लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.