२०१९ या वर्षात ९९५६ अपघात, ३९२६ जाणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2019

२०१९ या वर्षात ९९५६ अपघात, ३९२६ जाणांचा मृत्यू


मुंबई - सरत्या वर्षात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तब्बल ९ हजारांपेक्षा अपघात झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पेक्षा धक्कादायक म्हणजे या अपघातात ३९२६ जाणांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये ३५ हजार अपघात झाले. यात मोकळ्या भागात ५० टक्के, रहिवासी भागांत २६ टक्के अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यवसायिक आणि बाजार भागांत १५ टक्के आणि शैक्षणिक परिसरात ९ टक्के अपघात झाले आहेत. त्याचबरोबर ७६ टक्के अपघात सरळ रसत्यांवर झाले आहेत.

२०१८ मधील अपघातांचा पोलिसांनी अहवाल सादर केला आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. यात अपघातांची कारणे, वयोगट वेळ, अपघात झालेले मार्ग याची माहिती दिली आहे. त्यामध्ये कारणेही नमूद केली आहेत. ९ हजार ९५६ अपघात यावर्षाी झाले आहेत. त्यातही ३ हजार ५६५ प्राणांतिक अपघात झाले असून त्यात ३ हजार ९२६ जणांचा मृत्यू, तर ३ हजार ५४१ गंभीर अपघातांच्या घटनांत ५ हजार ६२३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातांत ८६ टक्के अपघात हे बेदरकारपणे वाहन चालवल्याने होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने वाहन चालवताना झालेल्या ३४८ प्राणांतिक अपघातात ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ८४ टक्के अपघात कायमस्वरूपी परवाना असलेल्या चालकांचे, ५ टक्के विना परवाना चालकांचे आणि ३ टक्के अपघात हे शिकाऊ चालकांमुळे. 

Post Bottom Ad