साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2019

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटी


नवी दिल्ली, 2 : महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख -
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी 9 लाख 55 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख 8 हजार 400 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Post Bottom Ad