नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील २१ राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित रँकिंग जारी केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी जारी केलेल्या २१ शहरांच्या या रँकिंगमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.
‘या रँकिंगमधून आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही. फक्त नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं हा हेतू आहे. पिण्याच्या पाण्याबाबत देशभरातून तक्रारी येत होत्या. दिल्लीतलंच पाणी पिण्यालायक नसल्याचं तपासात समोर आलं’, अशी प्रतिक्रिया राम विलास पासवान यांनी दिली.
गुणवत्ता ठरवण्याचे निकष -
पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता ठरवण्यासाठी १० मानकं निश्चित करण्यात आली होती. पाण्यातील आर्सेनिकसारख्या धोकादायक रसायनाचं प्रमाणही लक्षात घेण्यात आलं. ज्या शहरात महापालिकेच्या माध्यमातून पाणी दिलं जातं, त्याच शहरातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे.
शहरांची क्रमवारी -
मुंबई
हैदराबाद
भुवनेश्वर
रांची
रायपूर
अमरावती
शिमला
चंदीगड
त्रिवेंद्रम (तिरुवअनंतपुरम)
पाटणा
भोपाळ
गुवाहाटी
बंगळुरू
गांधीनगर
लखनौ
जम्मू
जयपूर
देहरादून
चेन्नई
कोलकाता
दिल्ली