मुंबई दि. 23 : आज देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे 28 व्या मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दिली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघेही परिश्रमपूर्वक कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा वाटचाल सुरू करणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.