आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करू - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2019

आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करू - रामदास आठवले


अकोला - डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मजबूतीने साकार करणार असून त्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रिपाइंचे संघटन आम्ही उभारले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइंला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा येत्या काळात आपण मिळवून देणार असल्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पेतील रिपाइंच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला येथील अकोला क्रिकेट क्लब च्या मैदानात आयोजित मेळाव्यात आठवले बोलत होते. यावेळी बोलताना, मागील 12 वर्षांपासून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षातर्फे दरवर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइं चा वर्धापन दिन साजरा केला जातो.यंदाचा रिपाइंचा 62 वा वर्धापन अकोला येथे साजरा करण्यात येत असून त्यांनीमित्त आयोजित रिपाइंच्या भव्य मेळाव्यात देशभरातून रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी मेळाव्याचे उदघाटक म्हणून प्रमुख मार्गदर्शन केले. 

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करावी;दलित भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी; बेरोजगारांना रोजगार द्यावा; अन्य राज्यांत मुलींचे शिक्षण मोफत आहे तसेच महाराष्ट्रात मुलींचे महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण पूर्ण मोफत करावे ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफी च्या धर्तीवर मागासवर्गीय महामंडळाकडून घेतलेली दलितांची कर्जे माफ करावीत अश्या मागण्यांच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आठवले म्हणाले. 

मराठा समाजसह सर्व सवर्ण समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाची योग्य अंमलबाजावणी झाली पाहिजे. कृषी मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी रिपाइं प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची माझी जबाबदारी असून मागासवर्गीय तरूणांनी केंद्र आणि राज्य सरकार च्या विविविध योजनांचा लाभ घ्यावा; मागासवर्गीय तरूणांनी सहकार क्षेत्राकडे वळले पाहिजे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. सहकार क्षेत्रात मागासवर्गीय तरूणांनी पुढे येऊन सहकारी सूत गिरणी ; सहकारी साखर कारखाने ; पतसंस्था; उद्योग क्षेत्रात पुढे आले पाहिजे त्यासाठी मागासवर्गीय तरुणांच्या पाठीशी मी उभा आहे; मागासवर्गीय तरुणांनी समाजात आर्थिक क्रांती करण्यासाठी उद्योग आणि सहकार क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी दलित आदिवासी बहुजन अल्पसंख्यांक सर्व समाजाला जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे संघटन उभारता आले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निळा झेंडा देशभर रिपाइं च्या माध्यमातून पोहोचविल्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइं साकार करण्यासाठी साथ देण्याचे आठवले यांनी केले. 

Post Bottom Ad