पालिका आरोग्य सेविकांना मिळणार दहा हजार मानधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2019

पालिका आरोग्य सेविकांना मिळणार दहा हजार मानधन


मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांना आता १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. यामुळे वर्षानुवर्ष तुटपुंज्या पगारावर काम करणार्‍या हजारो आरोग्य सेविकांना दिलासा मिळाला आहे. पालिका महासभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सुमारे चार हजार आरोग्य सेविका काम करीत आहेत. पोलिओ डोस पाजणे, आरोग्याशी निगडित विविध मोहिमांमध्ये त्यांना सहभाग करून घेतले जाते. या माध्यमातून त्यांना कामे करावी लागत आहेत. मात्र या कामासाठी त्यांना चार ते पाच हजारांचे तुटपुंजे मानधन मिळत होते. या पगारात वाढ करावी या मागणीसाठी मागील अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. याकडे प्रशासनाने लक्ष वेधून आरोग्य सेविकांना मासिक मानधन दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या पालिका महासभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता आरोग्य सेविकांना किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच किमान तीन लाख रुपये थकबाकी मिळणार आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे नेते अ‍ॅड प्रकाश देवदास यांनी दिली.

Post Bottom Ad