विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपनं १०५ जागा जिंकल्या असून, अन्य पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ११० पर्यंत पोहोचलं आहे, तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला असून, त्यांनाही अन्य पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ६१ वर पोहोचलं आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बळ मिळू शकलं नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेना युती होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच हा तिढा सोडवण्यासाठी भाजपनं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळं शिवसेना नक्की कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपनं विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
Post Top Ad
30 October 2019
Home
Unlabelled
शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्रिपदे
शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्रिपदे
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.