निवडीनंतर अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपला टोला लगावला. पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नाही असं ते म्हणाले. आम्ही निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे आनंदी नाहीत, असं ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ५४ जागा जिंकल्या आहेत. पक्षाच्या अनेक आमदारांनी निवडणुकीआधी आणि प्रचारादरम्यान भाजपची वाट धरली असली तरी, राष्ट्रवादी या निवडणुकीत तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं १०५ जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेनं ५६ जागा जिंकल्या आहेत.