आज सकाळी दहाच्या सुमारास वरळीतील मतदानकेंद्र क्रमांक ६२ येथील ईव्हीएम मशीन बंद पडली. एकामागोमाग सहा मशीन बदलल्यानंतरही मतदान होऊ शकले नाही. या ठिकाणी आलेले मतदार त्रस्त होऊन निघून गेले. दुपारच्या दरम्यान मतदान प्रक्रिया पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. तर धारावीतील ट्रान्झिट कॅम्पमधील एका मतदानकेंद्रात तर कलिना येथील सात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला त्यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे उर्वरित मतदान सुरळीतपणे पार पडले. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत अठरा बॅलेट युनिट, अठरा कंट्रोल युनिट, शंभर व्हीव्हीपॅट बदलून तातडीने नविन मशीन देण्यात आल्या. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही,' अशी माहिती मुंबई शहर जिल्हा माध्यम कक्षाकडून मिळाली.
Post Top Ad
21 October 2019
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.