मुंबई - विधानसभा निवडणुकीत २१ ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबईतील दुकान कामगारांना रजा अथवा सवलत देण्यात यावी, अशी सूचना पालिका प्रशासनाने दुकान मालकांना केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी तात्काळ व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना सोडून आपली दुकाने व आस्थापना बंद ठेवावीत. तसेच तात्काळ व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या कर्माऱ्यांना मतदानासाठी सवलत द्यावी, अशी सूचना पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. जर मतदानासाठी अडचण निर्माण करण्यात आली तर संबंधित मालकाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात देण्यात आला आहे. यासंबंधी तक्रार कुठे करावी याबाबत विभागवार अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे माबाईल नंबरही देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक -
व्ही. के. सिंग,
उप प्रमुख सुविधाकार
ए, बी, सी, डी, ई, एफ/दक्षिण विभाग
९८९२९३६६७३
एस. बी. रणसिंग, उप प्रमुख सुविधाकार
एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व विभाग
९८२०४९६६३०
जे. ए. ए. काझी, उप प्रमुख सुविधाकार
के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य विभाग
९१६७९७६६६७
एस. पी. सोनवणे, उप प्रमुख सुविधाकार
एल, एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, एस आणि टी विभाग
९३२४३५७६४३