सेना भाजपाने मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा करावी - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2019

सेना भाजपाने मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा करावी - आठवले


मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येवून निवडणूक लढवावी, त्यांनी आपसातील जागा वाटप निश्चित करावे मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा अजिबात झालेली नाही त्यामुळे मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर येत्या दोन दिवसात करावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

भाजप - 144, शिवसेनेत- 126 आणि मित्रपक्ष 18 असा जागा वाटपाचा फार्म्युला पुढे आला असून या फार्म्युल्याचे रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही स्वागत करीत आहोत. मित्र पक्षांना मिळणार्‍या 18 जागापैकी रिपाइं ला 10 किंवा 9 जागा सोडण्यात याव्यात. तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदाला रिपाइंचा पाठिंबा राहिल असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाइं ला किमान 9 जागा सोडण्यात याव्यात तसेच निवडून येणार्‍या नव्या सरकारमध्ये म्हणजे महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये रिपाइं ला 1 कॅबिनेट मंत्रीपद आणि 1 राज्यमंत्रीपद तसेच तीन महामंडळाची अध्यक्षपदे व उर्वरीत महामंडळांची सदस्यपदे, आणि 1 विधान परिषद सदस्यत्व (एमएलसी) देण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Post Bottom Ad