मला सबसिडी नको पण चालू कामात खोडा घालू नका - गडकरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2019

मला सबसिडी नको पण चालू कामात खोडा घालू नका - गडकरी


नागपूर - मला सबसिडी नको, मात्र चालत्या कामात खोडे टाकून त्याला पंक्चर करू नका, असं केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी परखड बोलण्यासाठी म्हणून ओळखले जातात. आज देखील त्यांनी असंच परखड भाष्य केलं आहे.

माझे प्रयोग आऊट ऑफ बॉक्स असतात, त्यामुळे कोणी लगोलग विश्वास ठेवत नाही. पण ते सगळे प्रयोग मी स्वतः यशस्वी करत असतो. त्यासाठी सरकारी मदत आणि अनुदान/सबसिडी मी घेत नाही. सरकारकडे मदत मागत नाही, असं मागील आठवड्यात गडकरी म्हणाले होते. त्यांनी हेच विधान आज पुन्हा एकदा अधोरेकित केलं आहे.

नागपुरात आज विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत उद्योग व्यवसायाला यशस्वी केलं जाऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

सरकारी कामावर बोलताना सरकार जिथे हात लावील तिथे सत्यानाश होतो, असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर देखील दिला होता.

Post Bottom Ad