या शानदार सोहळ्यात रामदास आठवले यांच्या समवेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे; राज्यमंत्री अविनाश महातेकर; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजा सरवदे; पूज्य भदंत राहुल बोधी; खासदार राहुल शेवाळे; आमदार कालिदास कोलंबकर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ऍड. आशाताई लांडगे; डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती चे सरचिटणीस नागसेन कांबळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी समोर उभारण्यात आलेली भीमज्योत हा चांगला उपक्रम आहे. हा कार्यक्रम वाद न करता समाजाच्या एकजुटीने होत आहे. ही भीमज्योत आंबेडकरी समाजाला सदैव ऐक्याचा आणि सत्तेतील सहभागाचा; मोक्याच्या जागा जिंकण्याचा मार्ग दाखवितव राहिल असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.