बेस्टने 5 रुपये भाडे केले असले तरी बोरीवली पूर्व भागातील टाटा पॉवरला जाण्यासाठी आजही रिक्षासाठी भल्यामोठ्या रांगा लागतात. यामागचे कारण असे की, टाटा पॉवरला जाण्यासाठी एकही स्वतंत्र बस नाही. २९९ क्रमांकाची बस दोन वर्षांपूर्वीच बंद केली. आता मागाठाणे डेपोतून लांब पल्ल्याला जाणाऱ्या 700-ठाणे, 498-संघर्ष नगर या बसेसने प्रवासी स्टेशनपर्यंत येतात. वाहतूककोंडीतून सुटका होऊन त्या बसेस 3 ते 4 तासांनी परततील तेव्हा मागठाणे परिसरात परततात. या सर्व बसेसचा सरासरी प्रतीक्षा काळ अर्धा ते पाऊण तासाचा जातो. त्यामुळे प्रवासी आजही रिक्षाचा आधार घेतात. प्रवासी बेस्ट बसला प्राधान्य देतात, पण बोरिवली स्थानक परिसरातून मागाठणेपर्यंत बस सुविधा नाही. भाईंदर, मिरारोडकडून येणाऱ्या बसेससाठी स्थानकाजवळच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत एलोरा हॉस्टेलपर्यंत जाणे प्रवाशांना त्रासाचे ठरते. त्यामुळे अर्धा-पाऊण तास बेस्ट बसची प्रतीक्षा करण्यापेक्षा पाच-दहा मिनिटे रांगेत उभे राहून बेस्टपेक्षा डबल भाडे देऊन वेळेत घरी पोहोचणे प्रवासी पसंत करतात. टाटा पॉवर ते बोरिवली स्थानक मार्गे राजेंद्र नगर या मार्गावर एखादी मिनि बस नियमित चालवली तरी चांगला महसूल मिळू शकतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र प्रवाशांच्या मागणीकडे बेस्ट प्रशासनच दुर्लक्ष करत आहे.