मुंबई – ‘आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न पणाला लावले पाहीजे, नाहीतर त्यांचा राहुल गांधी होईल’, असे वक्तव्य भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही तर त्यांचा राहुल गांधी हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने केला असेच होईल, असेही आंबेडकरांनी यावेळी म्हटले.
तसेच ‘येत्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचित बहुजन आघाडीकडे जाईल’, असे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना, ‘वंचित बहुजन आघाडी विरोधात नसेल तर सत्तेत असेल’, असे म्हणत आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या ‘गॅस सिलेंडर’ या निशाणाचा उल्लेख केला आणि ‘भाजपा यावेळी गॅसवर असेल’, अशी टीका केली आहे.