मुंबई दि. 22 - महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाची भूमिका ठरविण्याचे तसेच उमेदवार निवडीबाबतचे सर्व अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सोपविण्यात आले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत रिपाइंला एकूण 10 जागा त्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून एक जागा भाजप शिवसेना महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडावी असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.
एम आय जी क्लब बांद्रा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस रिपाइं केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले; महाराष्ट्राचे राज्यमंत्री अविनाश महातेकर; राजाभाऊ सरवदे( राज्यमंत्री दर्जा) रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; एम डी शेवाळे; भुपेश थुलकर; बाबुराव कदम ; पप्पू कागदे; गौतम सोनवणे; दीपकभाऊ निकाळजे;सुरेश बारशिंग;अनिल गांगुर्डे; डॉ विजय मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजप शिवसेना यांनी एकत्र येऊन महायुती मार्फत निवडणूक लढावी. विधान सभा निवडणुकित भाजप शिवसेना रिपाइं महायुती का निश्चित विजय मिळून महायुती च्या किमान 240 जागा निवडून येतील.असा विश्वास व्यक्त करीत महायुती चे दुसऱ्या टर्म च्या सरकार मध्ये रिपाइं ला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्यात यावे तसेच राज्यभरातील रिपाइं च्या 60 कार्यकर्त्यांना महामंडळाचे संचालक सदस्यपद; 2 महामंडळाची अध्यक्षपदे देण्यात यावेत तसेच तालुका आणि जिल्हा स्तरावरील शासकीय समित्यांमध्ये रिपाइं कार्यकर्त्यांना सदस्यपदी स्थान देण्यात यावे या मागण्यांचा ठराव राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत संमत करण्यात आला. या मागण्यांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक डिव्हिजन मधील विधानसभेची एक जागा भाजप शिवसेना महायुतीने रिपाइंला सोडावी त्यासाठी विभागनिहाय जागांची यादी भाजपला पाठविण्यात आली आहे.
त्या जागांची यादी पुढीलप्रमाणे :- मुंबईतील शिवाजीनगर मानखुर्द; चेंबूर; मालाड ; धारावी ;चांदीवली; कुर्ला; आणि वर्सोवा या जागांची नावे रिपाइं ने भाजप कडे चर्चेसाठी पाठविल्या आहेत. कोकण मधील कर्जत खालापूर ;अंबरनाथ; उल्हासनगर, पश्चिम महाराष्ट्रातील फलटण, उत्तर महाराष्ट्र्रातुन भुसावळ; चाळीसगाव; देवळाली; श्रीरामपूर विदर्भ मधून भंडारा; चंद्रपूर; उमरखेड; नागपूर उत्तर; पांढरकवडा (अरणी) मेहकर आणि बडनेरा मराठवाडा मधून केज ;उदगीर; देगलूर; गंगाखेड तसेच पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माळशिरस ; साताऱ्यातुन फलटण पुण्यातून पुणे कॅन्टोन्मेंट आणि पिंप्री या जागांवर रिपाइं ने दावा केला आहे.राज्य भरातून किमान 10 जागा रिपाइं ला भाजप शिवसेना महायुती ने सोडाव्यात असा प्रस्ताव रिपाइं ने भाजप ला दिला असल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांनी दिली आहे.