शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2019

शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही


मुंबई, दि.27 : शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांना निवडणूकविषयक काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दिव्यांग व्यक्तीची व्याख्या 'इक्वल ॲपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996' मध्ये देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी/ कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबत महत्त्वाचे आणि जोखमीचे काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दिव्यांगांसाठी तळमजल्यावर मतदान -
अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्यात निवडणूकविषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मतदानाची व्यवस्था तळमजल्यावर केली जाईल. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींची मतदान केंद्रनिहाय माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. मतदानासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad