निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारात निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवणे बंधनकारक असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे एक लाख ११ हजार कर्मचार्यांपैकी सद्या ती हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या कामासाठी आरोग्य विभाग, किटक नाशक विभागासह सामान्य प्रशासन विभागातील शेकडो कर्मचार्यांचा समावेश असल्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी चार हजार कर्मचा-यांना पाठवण्यात आले होते.
नागरिकांची गैरसोय होणार नाही -
निवडणूक आयोगाकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे पालिकेला बंधनकारक असते. हे आदेश पाळले नाही तर संबंधित अधिकार्यावर गुन्हा नोंद होणे, अटक होणे अशी कारवाई होऊ शकते. शिवाय संपूर्ण देशासाठी लोकशाही प्रक्रिया आवश्यक असल्यामुळे पालिकेकडून कर्मचारी पाठवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र जरी तीन हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले असले तरी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.