मुंबई - मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तिकीट खिडक्यांवरील रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. एटीव्हीएम, जेटीबीएस आणि मोबाईल स्कॅन करुन तिकिट घेण्याची सुविधा एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी २७ रेल्वे स्थानकांवर एकूण ६८ विशेष तिकिट गृह उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
तिकिट खिडक्यांवरील रांगेतील गर्दी कमी करण्यासाठी स्थानकातील मोकळ्या ठिकाणी ही गृहे उभारण्यात येतील. एटीव्हीएम, जेटीबीएस, अधिकृत तिकिट देणारे एजंट, मोबाईल स्कॅन करण्यासाठी बारकोड या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सीएसएमटी, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनससह प्रवासी वर्दळ जास्त असलेल्या २७ रेल्वे स्थानकांवर एकूण ६८ तिकिट गृह उभारण्यात येणार आहे. तिकिट गृह उभारण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देण्यात आली असून येत्या तीन महिन्यात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
यूटीएस अॅपच्या माध्यमाने मोबाईलवरुन तिकिटांसह मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास ही काढण्याची सुविधा उपलब्ध असल्याने रांगेतील गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी यूटीएस अॅपचा वापर करावा, असे आवाहन ही मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.