पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2019

पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा - मुख्यमंत्री

नांदेड: 'वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी' टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता 'बी' टीमसारखी झालीय. वंचित आघाडी 'ए' टीम झालीय. भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं नांदेड इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणावरून भाजपवर होणारे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. 'शरद पवारांनी काळाची पावलं ओळखायला हवीत. लोकांना सध्या नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आश्वासक वाटत आहे. राष्ट्रवादी हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. तिथं लोकांना भविष्य नाही. त्यामुळं ते भाजपमध्ये येत आहेत. त्यावर पवारांनी काय प्रतिक्रिया द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले. 

नारायण राणे भाजपचेच खासदार -
नारायण राणे हे भाजपमध्येच आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. प्रश्न केवळ त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा आहे. शिवसेनेला विश्वासात घेऊन तो सोडवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Post Bottom Ad