मुंबई : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केल्याने गेल्या काही दिवस रिक्त असलेल्या या पदावर अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवाब मलिक यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. सचिन अहिर यांनी पक्षाचा आणि मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोध असल्याची चर्चा होती.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे आणि आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्यापुढे असणार आहे.