'MCGM 24x7' अॅपमध्ये महापालिका व बेस्टचे वाहनतळ सापडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2019

'MCGM 24x7' अॅपमध्ये महापालिका व बेस्टचे वाहनतळ सापडणार


मुंबई - मुंबई महापालिकेच्या पार्किंग सुविधेचा नागरिकांना चांगला उपयोग करून घेता यावा यासाठी 'MCGM 24x7' या भ्रमणध्वनी आधारित अॅण्ड्रॉईड अॅपमध्ये 'पार्किंग' विषयक मोड्यूल सोमवारपासून सुरू करण्यात आले. यामुळे नागरिकांना ते असलेल्या परिसरातील ५०० मीटर आणि ५ किलोमीटरच्या परिघातील महापालिकेचे व बेस्टचे वाहनतळ सहजपणे शोधता येणार आहे. 

मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधाविषयक कामे अधिक चांगल्या गुणवत्तेची व्हावीत, यासाठी महापालिका दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस अव्याहतपणे कार्यरत असते. या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक वेगवान व्हावी, यासाठीही महापालिकेकडून सातत्यपूर्ण प्रयत्न नियमितपणे करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 'MCGM 24x7' या भ्रमणध्वनी आधारित अॅण्ड्रॉइड अॅपमध्ये 'पार्किंग' विषयक मोड्यूल सुरू करण्यात आले आहे. या मोड्यूलमध्ये सध्या महापालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांसह बेस्टच्या अखत्यारितील वाहनतळांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाहनतळविषयक बाबींमध्ये अधिकाधिक सुसूत्रता यावी आणि सर्वसमावेषक नियोजन व्हावे, यासाठी 'बृहन्मुंबई महापालिका विकास आराखडा २०३४' मधील तरतुदींनुसार 'मुंबई वाहनतळ प्राधिकरण' गठित करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्याच पुढाकाराने
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करित महापालिकेच्या 'MCGM 24x7' या अॅण्ड्रॉइड अॅपमध्ये 'पार्किंग' विषयक स्वतंत्र मोड्यूल पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे.

असा करा अॅपचा उपयोग --
* 'MCGM 24x7' हे अॅप 'प्ले स्टोअर'वर मोफत उपलब्ध आहे.
* नागरिकांनी आपल्या भ्रमणध्वनीमध्ये अॅप डॉउनलोड करुन 'इन्स्टॉल करणे.
*ज्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये यापूर्वीच अॅप 'इन्स्टॉल' करण्यात आले आहे, त्यांनी ते अद्ययावत करणे आवश्यक.
*आधीचे 'अॅप' अनइन्स्टॉल करून नव्याने इन्स्टॉल करता येईल.
* अॅप कार्यान्वित झाल्यानंतर वाहनचालक ५०० मीटर परिघातील आणि ५ किलोमीटरच्या परिघातील वाहनताळाची ठिकाणे नकाशावर दिसतील.
*सोयीच्या ठिकाणावर क्लिक केल्यानंतर सदर वाहनतळाची संक्षिप्त माहिती दिसेल.
* वाहनतळावर शुल्क आकारत असल्यास त्याचीही माहिती दिसेल.
* तळाशी असलेल्या 'डायरेक्शन' (Direction) या 'लिंक'वर क्लिक केल्यानंतर वाहनचालकाला वाहनतळापर्यंत जाण्याचा मार्गही दिसेल.

Post Bottom Ad