नवी दिल्ली - सोशल मीडिया म्हटलं की सर्वात आधी फेसबुकचंच नाव समोर येतं. सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून अधिक युजर्स आहेत. फेसबुकची विशेष बाब अशी की फेसबुकची सर्व सेवा यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळते. पण, कदाचित यापुढे फेसबुक आपल्या युजर्सकडून मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता आहे.
फेसबुकच्या मुख्य पेजवर साइन अपचा पर्याय असतो. अकाउंट उघडायचं असेल तर इथे साइनअप करावं लागतं. काही दिवसांपूर्वीपर्यंत साइनअपच्या खाली 'It's Free and always will be' अशी टॅगलाइन दिसायची. मात्र आता ती बदलण्यात आली आहे. आता जुनी टॅगलाइन बदलून ती 'It's quick and easy' अशी केली आहे. वेबॅक मशीनच्या माहितीनुसार, फेसबुकने ही टॅगलाइन ७ ऑगस्टच्या आसपास बदलली आहे. युजर्ससाठी फ्री असूनही फेसबुक जाहिरातींच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. फेसबुक युजर्सना फ्रेंड्स आणि फॅमिलीशी कनेक्ट होण्याचा पर्याय देतं, पण बदल्यात ते युजर्सची वैयक्तिक माहितीही गोळा करतं. या डेटा अन्य कंपन्यांशी शेअर करतं, जेणेकरून कंपनी टारगेट युजर्सना जाहिरात दाखवून व्यवसाय वाढवू शकेल.