मुंबई दि. 19 - आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी एकत्रित महायूती मार्फत निवडणूक लढावी. शिवसेना, भाजप यांनी एकत्रच राहावे असा सल्ला देऊन रिपाइं साठी विधानसभेच्या 10 जागा सोडाव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रिपाइं ला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे उपाध्यक्ष पद आणि आणखी एक महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात यावे तसेच महामंडळाची सदस्य पदांची नियुक्ती लवकर जाहिर करण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाइं ला विधानसभेच्या जागा निश्चित सोडण्यात येतील तसेच शिवसेना, भाजप महायूतीची एकजूट अभेद्य राहणार असल्याचे आश्वासन आठवलेंना दिले.
सांगली आणि कोल्हापुर या भागात महाजलप्रलयाने आतोनात नुकसान झाले असुन तेथील जनजीवनाचे पुनर्वसन करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणुन सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी 50 लाखांचा खासदार निधी जाहिर केला त्यापैकी प्रत्येकी 25 लाखाचा निधी सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्याच्या जिल्हा अधिकार्यांना ना. आठवले यांनी पाठविला आहे तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष लखमेंद्र खुराना यांनी 11 लाख रुपयांचा धनादेश आणि रिपाइं चे प्रवक्ते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस आज रामदास आठवलेंच्या उपस्थितीत देण्यात आला. रिपाइं च्या वतीने राज्यभरातुन पुरग्रस्तांना विवीध वस्तु रुपाने मदत होत असुन मुख्यमंत्री सहायता निधी आज 12 लाख तर ना. रामदास आठवले यांच्या खासदार निधीतुन 50 लाख अशी भरीव मदत करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात रिपाइंचे सरचिटणीस राज्यमंत्री अविनाश महातेकर राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, रिपाइं युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे आदि मान्यवर उपस्थित होते.