पुनर्बांधणी इमारतींतल्या फिटनेस सेंटरला आता निवासी दरात पाणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2019

पुनर्बांधणी इमारतींतल्या फिटनेस सेंटरला आता निवासी दरात पाणी

मुंबई : पुनर्बांधणी केलेल्या इमारतींमध्ये विकास नियम व नियमावली अंतर्गत चटईक्षेत्र निर्देशांक सूट देऊन मंजूर करण्यात आलेल्या फिटनेस सेंटरना पाणीपुरवठ्यासाठी जलआकार नियमावलीमधील सुधारित नियमानुसार यापुढे निवासी दरात पाणी मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे..

फिटनेस सेंटरला विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे एफएसआयनुसार सवलत देण्यात आली आहे. पुनर्विकास करणाऱ्या इमारतींमध्ये विकासक किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट क्षेत्रफळ असलेली जागा फिटनेस सेंटरसाठी आराखड्यात मंजूर करून घेतात. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तव्याचे प्रमाणपत्र मिळवताना या सेंटरचे हस्तांतरण गृहनिर्माण संस्थेस देण्याबाबत हमीपत्र सादर करावे लागते. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जलजोडणीसाठी अर्ज केला जातो. मात्र, जलआकार नियमावलीत स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे प्रतिहजार लिटरसाठी ५० रुपये ९९ पैसे आकारले जातात. यावर स्थायी समितीत नगरसेवकांनी आक्षेप घेत फिटनेस सेंटरला निवासी दरात पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. बोरिवली पूर्व येथील हेमगिरी को.ऑप. सोसायटीमधील फिटनेस सेंटरला वाणिज्य दरात जल आकार भरावा लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले होते. आता सुधारित जल आकार नियमावली नियम क्रमांक १.१(१) जी नुसार प्रति एक हजार लिटरसाठी आता ५ रुपये ९ पैसे आकारले जाणार आहेत.

Post Bottom Ad