रस्ता रुंदीकरण व इतर प्रकल्पांमध्ये घरे जाणाºया प्रकल्प ग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन केले जाते. आतापर्यंत माहुलमध्ये पुनर्वसन क रण्यात आलेल्या प्रकल्पबाधितांना सुविधा अभावी व जीवघेण्या प्रदूषणामध्ये राहावे लागते आहे. घरांपासून रोजगाराच्या जवळपास किंवा सुविधा असणाºया ठिकाणी पर्यायी जागा मिळावी यासाठी प्रकल्पबाधितांचा लढा सुरु आहे. मात्र शहरात इतर ठिकाणी एवढ्या संख्येने घरे नसल्याचे सांगत पालिका प्रकल्पबाधितांना माहुल येथेच स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेत असल्याने त्याला तीव्र विरोध केला जातो आहे. मात्र आता १९ ठिकाणी १७ हजार घरे उपलब्ध असल्याने या ठिकाणी प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे देण्याची मागणी सत्ताधारी, विरोधकांकडून के ली जाण्याची शक्यता आहे.
कुठे आहेत रिक्त घरे -
'एमएमआरडीए'ने २०१२ पासून प्रकल्पबाधितांसाठी काही इमारती बांधल्या आहेत. त्यांचा ताबा पालिकेकडे दिला आहे. पालिकेकडे सध्या, सुमननगर चेंबूर, बोरिवली,माहुल, मलबार हिल, भांडुप, सायन, धारावी, चित्ता कॅम्प, गोराई, देवनार, खार, चांदीवली, वाशी नाकाजवळ, लल्लूभाई कंपाउंड आदी १९ ठिकाणी तब्बल १६३ इमारतीच्या ३५० विंगमध्ये ११०४ मजले असून त्यामध्ये २३,७४२ सदनिका आहेत. त्यापैकी ६५३९ सदनिकांमध्ये नागरिक राहत असून उर्वरित १७,२०३ सदनिका रिक्त असल्याचे कबूल केले आहे.