मुंबईतील उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी पालिका प्रशासनाकडून नवे धोरण तयार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याने, मैदानांबाबत मुंबईकरांना काय वाटते, कोणत्या सुविधा महत्वाच्या वाटतात आदींबाबत हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबईकरांनी आपल्या सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. यातील महत्वाच्या सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे संबंधित अधिकाºयाने सांगितले.
महापालिकेच्या सुमारे १ हजार ६८ भुखंडांवर महापालिकेची उद्याने, मैदाने व मनोरंजन मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात नियमितपणे केला जातो. उद्यानांची व मैदानांची देखभाल स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यादृष्टीने नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या स्तरावर सुरु आहे. धोरणाचा प्राथमिक मसुदा अधिकाधिक लोकाभिमुख पद्धतीने व सर्वसमावेशक असावा, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांकडून सूचना, अभिप्राय व सल्ले आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. उद्याने व मैदाने देखभालीसाठी महापालिकेद्वारे तयार करण्यात येणाºया धोरणाच्या प्राथमिक मसुद्याबाबत नागरिकांद्वारे पाठविण्यात येणाºया सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.