हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल आॅडिट केले असून या अहवालानुसार आणखी २१ पूल धोकादायक आढळले आहेत. आॅडिटमध्ये आढळलेल्या एकूण २९ धोकादायक पुलांपैकी आठ पूल पाडण्यात आले आहेत. तर धोकादायक पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद करण्यात करण्यात आले आहे. सद्या पावसाळा असल्यामुळे पुलांची दुरुस्ती आॅक्टोबरमध्येच सुरू होणार आहे. मात्र मुंबईतील काही पूल जुने, व जर्जर झाले आहेत. मागील काही काळात पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येत्या दोन सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांना पूल पार करून विसर्जन करावे लागणार आहे. अनेक पूल जुने व कमकुवत झाले असल्याने पुलावरुन जाताना नाचू नये. शिवाय पुलावर न रेंगाळता शांतपणे पूल पार करावा अशा सूचना सर्व गणेश मंडळांना पालिकेने केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे आयोजन करणाºया मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ही मुंबईतील गणेश मंडळांची मुख्य संघटना आहे. काही पुल बंद केल्यामुळे विसर्जन मार्गात बदल करण्यात आले आहेत. ती आमची मुख्य चिंता आहे. नव्या मार्गावर सरकारने सुरक्षा द्यावी. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयांची व्यवस्था करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी केली. मुंबई महापालिकेने आम्हाला कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाच-गाणी करु नका सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती लक्षात घेता समन्वय समितीने पोलिसांकडे प्रत्येक मंडळाच्या दहा मुलांना सुरक्षा व्यवस्था कशी हाताळायची त्याचे प्रशिक्षण द्यावे अशी विनंतीही मंडळांनी केली आहे. तसेच गणेश मंडळांविरोधात ध्वनि प्रदूषणाचे जे गुन्हे आहेत त्याची न्यायालयात जलदगतीने सुनावणी घ्यावी किंवा राज्य सरकारने ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे.
धोकादायक पूल -
वाकोला पाइप लाइन सर्व्हिस रोड ब्रीज, जुहू तारा रोड ब्रीज, धोबी घाट मजास नाला ब्रीज, मेघवाडी नाला ब्रीज शामनगर अंधेरी, वांद्रे-धारावी मिठी नदी ब्रीज, रतननगर-दौलतनगर ब्रीज कांदिवली, ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव ब्रीज, पिरामल नाला ब्रीज लिंकरोड गोरेगाव, चंदावडकर नाला ब्रीज मालाड, गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड ब्रीज, प्रेमसागर नाला एसव्ही रोड ब्रीज मालाड, फॅक्ट्री लेन बोरिवली ब्रीज, कन्नमवारनगर घाटकोपर, लक्ष्मीबाग नाला ब्रीज घाटकोपर, नीलकंठ नाला घाटकोपर
पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल
हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नाला ब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंजजवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज
पूर्व उपनगरातील धोकादायक पूल
पूर्व उपनगरात आढळलेल्या सात धोकादायक पुलांपैकी चार पूल तोडण्यात आले असून कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज