मुंबई - शहराचे जीवनवाहिनी असलेले तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱया प्रमुख सात तलावांपैकी विहार तलाव काल (दिनांक ३१ जुलै, २०१९) रात्री ९.१५ मिनिटांनीओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव दिनांक १६ जुलै, २०१८ रोजी सकाळी १०.३० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता.
सर्वप्रथम तुळशी तलाव दिनांक १२ जुलै, २०१९ सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला. त्यानंतर तानसा तलाव दिनांक २५ जुलै, २०१९ दुपारी २.५०मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव दिनांक २६ जुलै, २०१९ रोजी सायंकाळी ५.२० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला तर विहार तलाव काल ३१ जुलै, २०१९ रोजीरात्री ९.१५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण साडेचौदा दशलक्ष लिटर असून आजपर्यंत सातही तलावात १२ लाख ५७ हजार ७१२ लक्ष लिटर्सम्हणजेच साधारणतः ८६.९० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.