मुंबई, दि. 30 : राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6,रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67.