तानसा तलाव ओव्हरफ्लो ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2019

तानसा तलाव ओव्हरफ्लो !

मुंबई - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण काठोकाठ भरून वाहू लागलं. याअगोदर तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. 

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावांत मिळून ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामध्ये तुळशी तलाव १२ जुलै रोजी तर तानसा तलाव आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. सध्या सुरु असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरून वाहू लागतील, असा अंदाज जलविभागाकडून व्यक्त केला जातो आहे.

Post Bottom Ad