मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोड मध्ये काम करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले. सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारल्यांनतर मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ.खाडे बोलत होते.
यावेळी डॉ.खाडे म्हणाले, शिष्यवृत्ती योजना व घरकुल योजना जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. विभागाच्या विविध महामंडळांच्या योजनांचा लाभही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचवावा. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण केले.