बेस्ट नफ्यात आणण्यासाठी खासगी बसचा आधार - प्रवीण परदेशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2019

बेस्ट नफ्यात आणण्यासाठी खासगी बसचा आधार - प्रवीण परदेशी


मुंबई  - आर्थिक तोट्यात अडकलेल्या बेस्ट उपकरणाला नफ्यात आणण्यासाठी खासगी बसचा आधार घ्यावा लागेल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले. सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. प्रतिदिन हजार कोटी रुपयांचा तोटा बेस्टला सहन करावा लागतो आहे. तर इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून केवळ दीडशे कोटी रुपये नफा मिळतो. परंतु, कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे बेस्टकडे निधीची कमतरता आहे. यामुळे खाजगी तत्वावर चार ते पाच हजार बसगाड्या घ्याव्या लागणार आहेत. संचित तोटा, नुकसान आणि खर्च यामुळे कमी होण्यास मदत होईल. मात्र, बेस्ट उपक्रमातील मनुष्यबळ कमी केला जाणार नाही, अशी ग्वाही परदेशी यांनी दिली. तसेच खासगी बस गाड्यांना कामगार संघटनांचा असलेला विरोध मोडीत काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका स्वायतः संस्था आहे. येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पालकत्व प्रशासनाचे असते. परंतु, बेस्ट उपक्रमाचा तोटा अधिक आहे. तो भरुन काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतील. त्यानंतर शिल्लक राहणारा तोटा भरुन काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिका स्विकारेल, असा दावा आयुक्त परदेशी यांनी केला.

Post Bottom Ad