आचारसंहिता भंगप्रकरणी मोदी-शहांबाबत ६ मेपर्यंत निर्णय घ्या - सर्वोच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2019

आचारसंहिता भंगप्रकरणी मोदी-शहांबाबत ६ मेपर्यंत निर्णय घ्या - सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगप्रकरणी कॉँग्रेसने दाखल केलेल्या नऊ तक्रारींवर ६ मेपर्यंत निर्णय देण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आयोगाला दिले. 

कॉँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाकडे मोदी-शहांविरोधात अकरा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यापैकी आयोगाने केवळ दोनच तक्रारींवर निर्णय दिला. या दोन्ही प्रकरणांमध्ये आयोगाने मोदींना 'क्लीन चिट' दिली आहे. लातूर आणि वर्धा येथे मोदींनी भाषणातून आचारसंहितेचा भंग केला होता, असा दावा करून या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, आयोगाने त्यांना 'क्लिन चीट' दिली. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निष्क्रियेतवरदेखील देव यांनी बोट ठेवले. आयोग भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केला आहे. निवडणुकींची घोषणा झाल्यापासून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी प्रक्षोभक भाषणे करून आणि भाषणांमध्ये लष्कराच्या जवानांचा राजकीय वापर करून आचारसंहितेचा भंग केल्याचेही, देव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Post Bottom Ad