नाशिकची महिला "मिसेस वर्ल्ड २०१९" च्या फायनल राऊंडमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2019

नाशिकची महिला "मिसेस वर्ल्ड २०१९" च्या फायनल राऊंडमध्ये

मुंबई - 25 हजार प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत नाशिकच्या रंजना दुबे "हॉट मॉण्ड" मिसेस वर्ल्ड २०१९ च्या फायनल राऊंडमध्ये पोहचल्या आहेत. आता पर्यंत या स्पर्धेत आलेल्या सर्व आव्हानांवर त्यांनी मात करत फायनल राऊंड पर्यंत मजल मारली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेचा अंतिम राऊंड होणार आहे. 

रंजना या एक अभिमानी पत्नी, दोन मुलांची आई आणि आयटी प्रोफेशनल आहेत. त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला आहे. पुणे विद्यापीठातून विज्ञानाची त्यांनी पदवी घेतली आहे. सध्या त्या केनिया (नैरोबी) येथे राहत असूनही त्यांच्या हृदयात आजही भारत आहे. "मिसेस वर्ल्ड २०१९" स्पर्धेत भाग घेणाऱ्या रंजना दुबे यांनी वेळोवेळी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ते काम नक्की पूर्ण करता येते, अशीच जिद्द मनात बाळगून दुबे यांनी स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. रंजना यांनी परदेशात सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवली आहे. त्यांनी मिसेस वर्ल्ड स्पर्धा जिंकण्याची तयारी पूर्ण केली आहे. आपले विचार सकारात्मक असल्यास आपली स्वप्न कधीही पूर्ण केली जाऊ शकतात असे त्या मानतात. महिलांवरील अत्याचार वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन दुबे यांनी केले आहे.

Post Bottom Ad