रेल्वे, मेट्रो, आणि रस्ते वाहतुक सुधारणेसह रोजगार, महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर - मनोज कोटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2019

रेल्वे, मेट्रो, आणि रस्ते वाहतुक सुधारणेसह रोजगार, महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर - मनोज कोटक


मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहिर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चारभाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पुर्ण होत असून या आगळ्या वेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हेआश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्वाचे मुद्दे
रेल्वे, मेट्रो, आणि रस्ते वाहतुक सुधारणा
· मेट्रो ४ - वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
· मेट्रो २ बी - मानखुर्द - बांद्रा - बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
· मेट्रो ६ विक्रोळी - जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
· एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
· सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
· ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
· रेल्वे फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढवण्यासाठी मध्य रेल्वेवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही अत्याधुनिक
सिग्नलींग यंत्रणा कार्यान्वित करणार
· कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
· मुलुंड - गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर - अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
· विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्‌डाणपुलाचे काम पूर्ण करणार
· वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पुर्व द्रूतगती महामार्गावरील ऐरोली, कांजूरमार्ग, घाटकोपर आणि छेडानगर जंक्शनवर उड्‌डाणपुलाचे काम पुर्ण करणार
· घाटकोपर रमाबाई नगर - कामराज नगर येथे महामार्ग ओलांडण्यासाठी उन्नत मार्ग किंवा भुमिगत मार्गाचे काम पुर्ण करणार

नागरी सुविधा
· ईशान्य मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे ऑडिट करणार, भुमिगत पार्किंग सुरू करणार
· मुलुंड डंपिंगच्या जागेवर उद्याननिर्मिती
· देवनार, कांजूरमार्ग डपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करणार
· ईशान्य मुंबईत पाचशे बेडचे सुपर स्पेशालिटी व कॅन्सर रुग्णालय उभारणार
· सर्व प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेच्या उपाययोजना करणार

महिला सक्षमीकरण
· ईशान्य मुंबईतील एक रेल्वे स्थानक सर्व महिला संचालित स्वरूपात कार्यान्वित करणार
· ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग डिस्पेन्सर व इन्सीरेटर मशीन बसवणार
· महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना विशेष सहाय्य व आर्थिक अनुदान सहाय्य
· महिला सुरक्षा यंत्रणा बळकटीकरणास प्राधान्य देणार
· महिलांसाठी राखीव खेळाचे मैदान

कौशल्य विकास व रोजगार
· रोजगार सहाय्यतेसाठी रोजगार मेळावे, रोजगार सहाय्यता केंद्र, मुद्रा लोन सहाय्य केंद्र उभारणार
· युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र गतीशील करणार
· शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ शक्तीस्थळ उभारणार
· दिव्यांग सहाय्यता केंद्र उभारणार
· ईशान्य मुंबईच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढविण्यासाठी विकासदूत संकल्पना राबवणार

Post Bottom Ad