राफेलसह मोदी व फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळयांची चौकशी करणार - पृथ्वीराज चव्हाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2019

राफेलसह मोदी व फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळयांची चौकशी करणार - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई - मुंबईचा डीपी प्लान दोनदा बदलून या देवेंद्र फडणवीस सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आमचे सरकार आल्यावर या घोटाळ्यासह फडणवीस सरकारच्या काळातील सर्वघोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांच्याप्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. याशिवाय नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत झालेले एखादे मोठे काम दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनीयावेळी दिले. तसेच एकनाथराव गायकवाड यांच्या रुपाने एक अनुभवी उमेदवार काँग्रेस महाआघाडीने या मतदारसंघात दिला असून गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनहीत्यांनी उपस्थितांना केले.

चेंबूर येथे झालेल्या या सभेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुलवामाचा हल्ला हे कारगिलप्रमाणेच आपल्या गुप्तचर संस्थेचेअपयश असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, कारगिल युद्ध समाप्तीनंतर वाजपेयींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिम्मत मोदीदा‌खवणार का, असा सवाल करत हे सरकार उलट शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारच्या जुमलेबाजीचाही त्यांनी खरपूस समाचारघेतला. मोदींनी २०१४ साली सत्तेवर येताना समाजातील प्रत्येक घटकाला वारेमाप आश्वासने दिली. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यापैकी किती आश्वासने पुर्ण झाली याचा हिशेब देण्याऐवजीयावेळच्या जाहिरनाम्यातही भाजपने शेकड्याने आश्वासने दिल्याचे चव्हाण म्हणाले. याउलट काँग्रेसचा जाहिरनामा ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असून देशातील वीस टक्के गरीबांना नजरेसमोरठेवून तयार केलेली ‘न्याय’ ही योजना या जाहिरनाम्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. इंदीरा गांधींनी त्यावेळी गरीबी विरोधात केलेल्या प्रभावी उपाययोजनेमुळे त्यावेळी पन्नासटक्क्यांपेक्षा अधिक असलेला गरीबीचा दर २१ टक्क्यांवर आला होता. आता न्याय योजनेमुळे गरीबीचे समूळ उच्चाटन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण संपुर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरलो, सर्व ठिकाणी मोदी सरकारविरोधात एक सुप्त लाट असून यावेळी महाराष्ट्रातील जनता मोदींना घरी पाठवेल, असाविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राफेल घोटाळा मोदी सरकारला भोवणार - 
राफेल घोटाळा म्हणजे या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा असून काँग्रेस सत्तेवर असताना जे विमान साडेपाचशे कोटींना घेण्याचा करार आम्ही केला होता, तेच विमान आता हे मोदी सरकारसाडेसोळाशे कोटींना घेत आहे. प्रत्येक विमानामागे हजार कोटी या सरकारने आपल्या खिशात घातले असून आम्ही सत्तेवर आल्यावर छत्तीस हजार कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी करून दोषींनातुरूंगात डांबणार असल्याचा पुनरूच्चार चव्हाण यांनी केला.

Post Bottom Ad