राज्यातील 17 मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 April 2019

राज्यातील 17 मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान


मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये उद्या 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 'सखी' मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व,मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य,मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या : - 
नंदुरबार- 18 लाख 70 हजार 117 ( पुरुष-9 लाख 43 हजार 745, महिला- 9 लाख 26 हजार 350), (मतदान केंद्र-2115) ;

धुळे- 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903, महिला-9 लाख 10 हजार 935), (मतदान केंद्र-1940) ;

दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82, महिला-8 लाख 27 हजार 555), (मतदान केंद्र-1884) ;

नाशिक- 18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892, महिला- 8 लाख 93 हजार 139), (मतदान केंद्र-1907) ;

पालघर- 18 लाख 85 हजार 297(पुरुष- 9 लाख 89 हजार, महिला- 8 लाख 96 हजार 178), (मतदान केंद्र-2170) ;

भिवंडी- 18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752, महिला- 8 लाख 51 हजार 921), (मतदान केंद्र-2200) ;

कल्याण- 19 लाख 65 हजार 131 (पुरुष- 10 लाख 61 हजार 386, महिला 9 लाख 3 हजार 473), (मतदान केंद्र-2063) ;

ठाणे- 23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379, महिला-10 लाख 76 हजार 834), (मतदान केंद्र-2452) ;

मुंबई उत्तर- 16 लाख 47 हजार 208 (पुरुष- 8 लाख 90 हजार, महिला - 7 लाख 56 हजार 847), (मतदान केंद्र- 1715) ;

मुंबई उत्तर-पश्चिम- 17 लाख 32 हजार (पुरुष- 9 लाख 50 हजार 302, महिला- 7 लाख 81 हजार 765), (मतदान केंद्र-1766) ;

मुंबई उत्तर-पूर्व- 15 लाख 88 हजार 331 (पुरुष- 8 लाख 64 हजार 646, महिला- 7 लाख 23 हजार 542), (मतदान केंद्र-1721) ;

मुंबई उत्तर-मध्य- 16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627 महिला- 7 लाख 63 हजार), (मतदान केंद्र-1721);

मुंबई दक्षिण-मध्य- 14 लाख 40 हजार 142 (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला- 6 लाख 62 हजार 337), (मतदान केंद्र- 1572) ;

मुंबई दक्षिण- 15 लाख 53 हजार 925 (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781), (मतदान केंद्र-1578) ;

मावळ- 22 लाख 97 हजार 405 (पुरुष- 12 लाख 2 हजार 894, महिला- 10 लाख 94 हजार 471), (मतदान केंद्र- 2504) ;

शिरुर- 21 लाख 73 हजार 527 (पुरुष- 11 लाख 44 हजार 827, महिला- 10 लाख 28 हजार 656), (मतदान केंद्र-2296);

शिर्डी- 15 लाख 84 हजार (पुरुष- 8 लाख 21 हजार 401, महिला- 7 लाख 62 हजार 732), ( मतदान केंद्र-1710).

Post Bottom Ad