भारताची लोकसंख्या १३६ कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2019

भारताची लोकसंख्या १३६ कोटी


नवी दिल्ली – भारताची लोकसंख्या १३६ कोटींच्या घरात पोहोचली असून ही वाढ २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आली आहे.

भारताची लोकसंख्या २०१९ मध्ये १३६ कोटींवर पोहोचली आहे. ती १९९४ मध्ये ९४.२२ कोटी एवढी होती. तत्पूर्वी ती १९६९ मध्ये ५४.१५ कोटी एवढी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी एवढी झाली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताच्या लोकसंख्येत २०१० आणि २०१९ मध्ये १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी एवढी होती. या अहवालानुसार, १९६९ मध्ये भारतात प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के एवढा होता. १९९४ मध्ये तो ३.७ टक्के राहिला. मात्र, जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात भारताने सुधारणा नोंदवली आहे.

जन्माबरोबरच १९६९ मध्ये सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये ६० वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष एवढे आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

Post Bottom Ad