मुंबई - ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्तीदिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वेस्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणिपदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अॅड. शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे. त्यांचाया भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, तेपाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही अॅड. शेलार यांनी व्यक्त केला.
तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रियसहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीहीअसो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो. जनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदार संघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.