मुंबई शहर जिल्हयात 75 लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2019

मुंबई शहर जिल्हयात 75 लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली


मुंबई, दि.19: मुंबई शहर जिल्हयात काल रात्री तीन वेगवेगळया ठिकाणाहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे 75 लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, 18 एप्रिल रोजी गुरुवारी गोल देऊळ एस.व्ही.पी. रोड, मुंबई या परिसरातुन मुंबा देवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने हुन्दई 120 या मोटार कारची (एम.एच.4 ई.एच.3212) तपासणी केली. गाडीमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन इसम होते. त्याच्याकडे 10 लाख रुपये रक्कम आढळून आली.

तसेच भायखळा परिसरात तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या स्थिर तपासणी पथकाने सायंकाळी ओला ॲसेन्ट गाडी क्र. एम.एच.43 बी.जी. 2843 या गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकुण 49 लाख 98 हजार 500 रुपये रक्कम आढळुन आली. तर अनिल रामचंद्र मोहिते यांच्या स्थिर तपासणी पथकाने ई.एम. पाटणवाला मार्ग, राणी बाग जवळ, भायखळा येथे ईको स्पोर्ट्स फोर्ड एम.एच 12 क्यू.वाय. 3964 या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 15 लाख रुपये आढळुन आले.

या तिनही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती 31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

Post Bottom Ad